Nashik Protest : नेट -सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीची आज निदर्शने

Nashik Protest : राज्‍यात शंभर टक्‍के प्राध्यापक भरती करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीतर्फे राज्‍यव्‍यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे.
Protest
Protestesakal

Nashik News : राज्‍यात शंभर टक्‍के प्राध्यापक भरती करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीतर्फे राज्‍यव्‍यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्‍यानुसार गुरुवारी (ता.२२) सकाळी अकरापासून हे प्राध्यापक जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

या संदर्भात जिल्‍हा प्रशासनाला लेखी सूचना देत आंदोलनाची माहिती दिली आहे. (Nashik NET SET Phd Holders Sangharsh Samiti protest)

Protest
Nashik News : तूर्त शहरात पाणी कपात नाही! जिल्हाधिकारी जलज शर्मांनी घेतला टंचाईचा आढावा

निवेदनात म्‍हटले आहे, की सीएचबी प्राध्यापकाचे शोषण थांबून शंभर टक्‍के प्राध्यापक भरती करण्यासाठी विविध टप्यांत आंदोलने केली जाणार आहेत.

यामध्ये पहिल्‍या टप्यांत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. यानंतरच्‍या टप्यांत २६ फेब्रुवारीपासून महाविद्यालयात काळा फिती लावून काम केले जाणार आहे.

तिसऱ्या टप्यांत ४ मार्चला सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. २७ मार्चला विद्यापीठ कार्यालयासमोर तर १५ एप्रिलला पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांच्‍या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असे निवेदनात स्‍पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Protest
Nashik ZP News : जि.प.कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचा निकाल घोषित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com