Shiv Jayanti 2024 : मिरवणुकांमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल; वाहतूक पोलिसांचे नियोजन

Shiv Jayanti 2024 : सोमवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातून मुख्य मिरवणूक निघते, तर उपनगर परिसरातही मिरवणुका निघतात.
Traffic Change
Traffic Changeesakal

Shiv Jayanti 2024 : सोमवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातून मुख्य मिरवणूक निघते, तर उपनगर परिसरातही मिरवणुका निघतात. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. (Shiv Jayanti 2024 Changes in city traffic)

त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी करीत, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मुख्य मिरवणूक (वाकडी बारव)

बंद मार्ग : वाकडी बारव-महात्मा फुले मंडई-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामतीर्थांपर्यंत.

पर्यायी मार्ग : निमाणी व पंचवटी कारंजापासूनच्या सिटी लिंक बस पंचवटी डेपोतून सुटतील. रविवार कारंजा व अशोतस्तंभ मार्गे जाणाऱ्या सिटीलिंक बस शालीमारवरून सुटतील.

- तसेच, सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका मार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

नाशिक रोड परिसर

- छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव

- १९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक, २० ते २२ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते साडेदहा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

Traffic Change
Shiv Jayanti 2024 : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

बंद मार्ग : बिटको चौक व सिन्नरफाटासह रेल्वेस्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक

- बिटको चौकातून जेल रोड मार्गे व नांदूर नाक्याकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक

पर्यायी मार्ग : रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्टे कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशन. सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक

- नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या सिटीलिंक बस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरून आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उपनगर सिग्नलमार्गे जातील

- पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील व येतील

- बिटको चौकातून जेल रोड मार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार समोरील रस्त्यावरून नारायणबापू नगरमार्गे टाकळीकडे जातील

- नांदूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरून एकेरी मार्गावर सुरू असेल

Traffic Change
Shiv Jayanti 2024 : शिवनेरी संग्रहालय आणि बालसंस्कार सृष्टीची शिवजयंतीला होणार घोषणा; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

अंबड परिसर

बंद मार्ग : बोधले नगर सिग्नल, कलानगर, पाथर्डी फाटा, पाथर्डी सिग्नल ते गरवारे दोन्ही बाजूंनी अवजड वाहतूक बंद

- पाथर्डी गाव ते शिवाजी पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद

पर्यायी मार्ग : गरवारे पॉइंट येथील उड्डाणपुलावरून द्वारकाकडे. बोधलेनगर सिग्नलवरून द्वारकापर्यंत व तेथून उड्डाण पुलावरून गरवारे पॉइंटकडे

- पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडव लेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसी मार्गे वाहने जातील.

पंचवटी परिसर

बंद मार्ग : मालेगाव स्टॅन्ड - इंद्रकुंड - पंचवटी कारंजा - दिंडोरी नाका

- मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे दोन्ही मार्ग

पर्यायी मार्ग : दिंडोरी नाका-पेठ नाका-मखमलाबाद नाका-रामवाडी

पूलमार्गे इतरत्र

- मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पूलमार्गे इतरत्र

- ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र

''शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक मार्गस्थ होतील. त्यामुळे वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

Traffic Change
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती; तारीख, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com