Illegal Tree Cutting in Nashik
sakal
नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी जिल्हा प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्चिम विभागीय खंडपीठाने संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीवर अंतरिम स्थगिती दिली. सोमवारी (ता. ५) दिलेल्या या आदेशानुसार, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वैध परवाना घेतल्याशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.