Niphad Assembly Election 2024
Niphad Assembly Election 2024 esakal

Niphad Assembly Election 2024 : चौरंगी लढतीचे संकेत

Latest Vidhan Sabha Election 2024 News : हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असल्याने येथून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on

निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना लोकसभेचे वातावरण आणि तालुक्यात शरद पवार यांना मानणारा वर्ग याचा फटका बसू शकतो. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह प्रहार आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आमदार दिलीप बनकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

आमदार बनकर यांच्यासमोर पारंप,रिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अनिल कदम प्रहारचे गुरुदेव कांदे आणि भाजपाचे यतीन कदम, मविप्र सभापती बाळासाहेब शिरसागर यांचे आव्हान असणार आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असल्याने येथून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Niphad Assembly Signs of four way fight)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com