Nashik News : यंदा निफाडचे नभांगन गुलाबी मैनाविना सुने सुने; घटलेल्या पर्जन्यमानाचा परिणाम

Nashik : दरवर्षी दांडी पौर्णिमेला रोजी पास्टर गुलाबी मैनांचे थवे निफाडच्या नभांगांना चित्ताकार्षक कवायतींद्वारे सकाळी आणि सायंकाळी पक्षीप्रेमींचे लक्ष केंद्रीत करतात.
swarms of pink myna Birds
swarms of pink myna Birds esakal

Nashik News : दरवर्षी दांडी पौर्णिमेला रोजी पास्टर गुलाबी मैनांचे थवे निफाडच्या नभांगांना चित्ताकार्षक कवायतींद्वारे सकाळी आणि सायंकाळी पक्षीप्रेमींचे लक्ष केंद्रीत करतात. मात्र, यंदा वातावरण बदलाचा फटका बसल्याने यंदा निफाडचे नभांगन गुलाबी मैनाविना सुने सुने असून, इतर पक्षांनीही पाठ फिरविल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. (Nashik Niphad will not see swarms of pink myna Birds this year)

निफाड शहरातील कादवा आणि विनता नदीच्या पाणथळ क्षेत्रावर हजारो पक्षी स्वछंदी मनाने विहार करतात. साधारणपणे जानेवारी ते एप्रिलदरम्यान गुलाबी मैना लाखोंच्या संख्येने शहर परिसरात आपले बस्तान बसवतात. यंदा संपूर्ण पक्षी हंगाम संपत आला, तरी गुलाबी मैनांचे थवे दाखल न झाल्याने निफाडकरांचा हिरमोड झाला आहे.

गुलाबी मैना सकाळी आणि सायंकाळी मधुर गुंजन व स्लाईड शोप्रमाणे कवायती करत येथील नागरीकांंच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. गुलाबी मैनांबरोरच देश विदेशातील स्थलांतरित पक्षी गप्पीदास, राखी वटवट्या, रान वटवट्या, चिरक, सुगरण, भांगवाली मैना, जांभळा सूर्यपक्षी, हळद्या, कोतवाल, शंकर, निळकंठ, बूलबुल, तांबट, हुदहुद, वेडा राघू, धोबी.

सामान्य पाकोळी, घर पाकोळी, भारद्वाज, घुबड, होला, लालपंखी होला, बगळा, गायबगळा, ढोकरी, हिरवी ढोकरी, रात्रींचर ढोकरी, राखी बगळा, बदामी पंचक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, छोटा शराटी, हळदी कुंकू, कापसी घार, दलदल, हरीण, जांबळी पाणकोंबडी. (latest marathi news)

swarms of pink myna Birds
Summer Heat : रसवंतीच्या घुंगरमाळा, लावि रसशौकिनांना लळा! ऊन्हाच्या कडाक्यात वाढ

चांदीबदक, शिकरा, चमचा, तुतारी, शेकाट्या, नदीसूरय, कबूतर, पारवा आदी विविध प्रजातींचे पक्षी निफाड शहरासह परिसरात डेरे दाखल होतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये गोदावरीसह तिच्या उपनद्यांची झालेली दयनीय अवस्था, घटलेले पर्जन्यमान आणि बिघडलेल्या पर्यावरण बदलाच्या फटका पक्षांच्या आदिवासावर झाला असून, निफाड परिसरात यंदा पक्षांचे गुंजणाऱ्या तराण्यावरती ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

"रोझी स्टरलिंग (गुलाबी मैंना), रोझी पास्टर (रंगीत साळुंखी) नेहमी घोळक्याने असतात. ज्वारीचे शेत व काटेसावर, पांगारा या झाडाच्या तांबड्या फुलांवर पक्षी आढळतो. युरोप, पश्चिम अशिया व मध्य आशियातून आपल्याकडे स्थलांतर करतात. सायंकाळी आकाशातील प्रचंड थव्यांच्या कसरती बघावयास मिळतात. यंदा मात्र, त्या दिसत नसल्याने निफाडकरांना सुने सुने वाटत आहे."- दीपक कायस्थ, पक्षीमित्र, निफाड

swarms of pink myna Birds
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीसाठी 20 मे रोजी मतदान; आचारसंहिता लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com