NMC News : वादग्रस्त यांत्रिकी झाडूंद्वारे सफाई वादात; अनियमिततेमुळे 80 हजारांचा दंड

महापालिकेकडून ‘एन-कॅप’ योजनेंतर्गत चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले.
nmc
nmc esakal

NMC News : महापालिकेकडून ‘एन-कॅप’ योजनेंतर्गत चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले. मुळात भारतात यांत्रिकी झाडू उपलब्ध असताना परदेशातून करण्यात आलेली खरेदी वादात असताना शहरात नियमित यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता होत नसल्याची बाब समोर आली आहे. निर्धारित केलेल्या कामाच्या ८० टक्के काम झाल्यास ठेकेदाराला देय रक्कमेवर दंड केला जातो. ( 80 thousand fine due to irregularity in cleaning with mechanical broom )

त्यानुसार चार महिन्यात ८० हजार रुपये दंड आकारण्यात आल्याने यांत्रिकी झाडूचे काम वादात सापडले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एन-कॅप) केंद्र शासनाकडून महापालिकेला अनुदान प्राप्त झाले आहे. त्या अनुदानातून सहा विभागांसाठी यांत्रिकी विभागाने चार यांत्रिकी झाडू खरेदी केले. १ जानेवारी २०२४ पासून शहरात यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सहा विभागात रस्त्यांची झाडलोट केली जात आहे.

जानेवारीत चार हजार ६९९ किलोमीटर, फेब्रुवारीत सहा हजार ७३ किलोमीटर, मार्चमध्ये पाच हजार ३३३ किलोमीटर याप्रमाणे तीन महिन्यात १६ हजार १०५ किलोमीटर रस्त्यांची झाडलोट करण्यात आली. एका रस्त्यावर तीन ते चार दिवसांनी झाडलोट केली जाते. दिवसा धुळ उडत असल्याने रात्री दहा ते सहा या वेळेत यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून रस्ते झाडले जातात. यंत्राचा पुरवठा करणाऱ्या कंपनीमार्फतच पाच वर्षे संचलन व देखभाल होणार आहे. (latest marathi news)

nmc
NMC News : महापालिकेला यांत्रिकी झाडू देण्यास केंद्राचा नकार

यांत्रिकी झाडूच्या नियंत्रणासाठी पीआरएस यंत्रणा आहे. नियमानुसार रस्ते स्वच्छतेसाठी कालावधी व किलोमीटरचे बंधन आहे. त्यात निर्धारित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या ८० टक्के काम झाल्यास देय असलेल्या रक्कमेवर दहा टक्के दंड आकारला जातो. त्या व्यतिरिक्त बंद अवस्थेतील जीपीआरएस यंत्रणा, रस्ते स्वच्छ करताना फवारणी बंद असणे, सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी न करणे, खत प्रकल्पाव्यतिरीक्त अन्य ठिकाणी कचरा फेकणे यावर देखील दंड केला जातो. त्यानुसार यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून तीन महिन्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या रस्त्यांची स्वच्छता

त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, मुंबई- आग्रा महामार्गांवरील सर्व्हिस रोड, इंदिरानगर- पाथर्डी रस्ता, हॉटेल गेटवे ते पाथर्डी गाव, द्वारका ते सिन्नर फाटा, देवळाली गाव ते नांदूर नाका, नवीन आडगाव नाका ते नांदूर नाका, निमाणी ते नवीन आडगाव नाका, त्र्यंबक नाका सिग्नल ते गडकरी चौक, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, एबीबी सर्कल ते इंदिरानगर बोगदा.

nmc
NMC News : अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; महापालिकेच्या विविध विभागांचे लेखा परिक्षण पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com