NMC News : आचारसंहितेपूर्वी सुधारित आकृतिबंधाला मंजुरी

NMC : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या ४९ विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रशासन विभागाने सुमारे दहा हजार पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्याची तयारी केली आहे.
nmc
nmcesakal

NMC News : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या ४९ विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रशासन विभागाने सुमारे दहा हजार पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्याची तयारी केली आहे. महासभेची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. महापालिकेची (NMC) स्थापना झाल्यानंतर १९९५ मध्ये शासनाने ७०९२ पदांचा पहिला आकृतिबंध मंजूर केला. (nashik NMC Approval of revised format before code of conduct marathi news)

त्यानंतर शहराचा विकास होत असताना लोकसंख्या वाढली. महापालिकेला ‘ब’ दर्जा मिळाला. या दरम्यान सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्ती तसेच अन्य कारणांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली. सद्यःस्थितीत ४८०० कर्मचारी कार्यरत आहे. महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने २०१७ मध्ये १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला.

अनेक वर्ष शासनाकडे सदरचा आकृतिबंध मंजुरीच्या प्रतिक्षेत होता. शासनाने मागील वर्षे तो अहवाल अव्यवहार्य ठरविला. शासनाने महापालिकेला सेवाप्रवेश नियमावली मंजुरी करण्यासाठी सूचना दिल्या. महापालिकेने सेवाप्रवेश नियमावली निश्चित केली. (latest marathi news)

nmc
NMC News : मराठी पाट्यांचा गोंधळ कायम! कामगार आयुक्त- महापालिकेत अधिकारावरून टोलवाटोलवी

त्याअनुषंगाने शासनाने महापालिकेला नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर ४९ विभागांचा सुधारित आकृतिबंधाचा एकत्रित प्रस्ताव महासभेच्या मान्यतेवर प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे.

''महापालिकेतील सर्वच ४९ विभागांकडून आवश्यक पदांची माहिती प्राप्त झाली असून, सुधारित आकृतिबंध तयार केला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल.''- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

nmc
NMC News : महापालिका अंतर्गत बदल्या शासन दरबारी? महत्त्वाच्या सेवांवर ताण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com