Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

Nashik News : नाशिक महापालिकेने नागरिकांचे महापालिका मुख्यालय किंवा विभागीय कार्यालयांमध्ये येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत.
NMC News
NMC Newsesakal

Nashik NMC News : शहरातील नागरिकांना ऑनलाइन सेवा सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या क्लाऊड सर्विसेसचे काम गेल्या आठ तासांपासून ठप्प असून सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे विस्कळित झाल्या आहेत. (Nashik NMC online service disrupted Server down)

नाशिक महापालिकेने नागरिकांचे महापालिका मुख्यालय किंवा विभागीय कार्यालयांमध्ये येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या सवलत मिळावी. यासाठी ॲप्लिकेशन विकसित केले आहे.

याद्वारे नागरिक कर भरण्यापासून ते विविध प्रकारच्या सेवा सुविधाबद्दलदेखील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करू शकतात. ऑनलाइन सेवा पुरवण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी जवळपास एक ते सव्वा कोटी रुपये खर्च केले जातात. सेवा सुरू करण्यासाठी क्लाऊड सर्विसेसचा वापर केला जातो.

या माध्यमातून संकलित होणारा डेटा सुरक्षित केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून ऑनलाइन सेवा विस्कळित झाली आहे. क्लाऊड सर्विसेस काम पाहणाऱ्या कंपनीने नवीन सर्व्हर घेतले असून जुन्या सर्व्हरमधून नवीन सर्व्हरमध्ये डाटा ट्रान्स्फर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागातून वेळ घेण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतरदेखील अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या ऑनलाइन सुविधा अडचणीत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत सेवा सुरळीत होईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक नितीन धामणे यांनी दिली. (Latest Marathi News)

NMC News
Nashik NMC News : ‘स्मार्ट’ प्रकल्पांचा भार महापालिकेच्या माथी; वीजजोडणी खर्चासह देयके भरण्याचा प्रस्ताव

या महत्त्वाच्या सेवांवर परिणाम

- ऑनलाइन मालमत्ता कर भरणा.

-हॉस्पिटल नोंदणी व नूतनीकरण.

- अग्निशमन ना- हरकत दाखले.

- नवीन मिळकत नोंदणी.

- झोन दाखला व थकबाकी दाखला.

- जन्म व मृत्यू नोंदणी.

- प्लंबिंग लायसन्स.

- जाहिरात परवानगी व वृक्ष विस्तार कमी करणे.

- ऑनलाइन तक्रार निवारण.

- फाइल मॅनेजमेंट सिस्टीम.

- नळ जोडणी व नवीन मिळकत नोंदणी.

- जैविक कचरा विल्हेवाट.

NMC News
Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com