Nashik News : पोलिस सुरक्षेशिवाय गौणखनिज कारवाई नको; जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठकीत एकमुखी निर्णय

Nashik News : गौणखनिज कारवाई ही पोलिस सुरक्षेशिवाय करण्यात येवू नये असा निर्णयासह अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांवर जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठकीत चर्चा करण्यात आली.
Officials of Nashik District Talathi Sangh while guiding the attendees at the executive meeting.
Officials of Nashik District Talathi Sangh while guiding the attendees at the executive meeting.esakal

Nashik News : तलाठी यांच्यामार्फेत करण्यात येणाऱ्या गौणखनिज कारवाई ही पोलिस सुरक्षेशिवाय करण्यात येवू नये असा निर्णयासह अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांवर जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तलाठी संघ प्रणित शाखा नाशिक जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठक निफाड येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (No minor mining operation without police security)

बैठकीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील क्षेत्रीय अधिकारी - कर्मचारी, पदाधिकारी असलेल्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यात आला. बैठकीच्या सुरवातीला मागील वर्षीचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. यानंतर जुनी पेन्शन आणि सरकारने पर्यायी दिलेल्या पेन्शन संदर्भात त्याचबरोबर जिल्हा किंवा उपविभाग बदलीचे धोरण यावर सविस्तर चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आले.

तसेच आगामी काळात होणाऱ्या बदली व पदोन्नती बाबतच्या समप्रमाणात सरकारच्या रेशोप्रमाणे करण्याचे आश्‍वासन उपस्थितांना देण्यात आले. त्याचबरोबर गौणखनिज कार्यवाहीच्या बाबतीत तलाठी संघांनी पोलिस सुरक्षा शिवाय कोणतीही कारवाई करायची नसल्याच्या बाबत सर्वानी एकमत दर्शविले. वेळेत वेतन होत नसल्याने तलाठी आणि मंडळ अधिकारी व महसूल ऑफिस कर्मचारी यांचे एकाच हेड खाली कोशागार कार्यालयातून वेतन करण्याची मागणी ही करण्यात आली.

यावेळी गावपातळीवर क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामे करताना येणार्‍या अडचणी, तांत्रिक अडचणी, कृषी गणना,ई-पीक पाहणी, ई- हक्क, प्रणाली, ई - केवायसी, डाटा कार्ड, अतिरिक्त सजेचे मानधन, गौण खनिज कार्यवाही करताना होणारे जीवघेणे हल्ले या सारख्या अनेक सर्व अडचणी संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी कार्याध्यक्ष नीलकंठ उगले यांनी दिली. (latest marathi news)

Officials of Nashik District Talathi Sangh while guiding the attendees at the executive meeting.
Nashik Child Malnutrition News : सुरगाणा तालुक्यात 13 बालके कुपोषणमुक्त

याप्रसंगी नाशिक जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय गाडे, सरचिटणीस अरुण फसाळे, खजिनदार नितीन मेधने , महिला उपाध्यक्ष प्रीती अग्रवाल,विभागीय अध्यक्ष संजय साळी, संदीप बागूल, निफाड अध्यक्ष शंकर खंडागळे यांनी उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी सभासदांचे आभार मानले.

पदाधिकाऱ्यांची निवड

बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बागलाण तालुक्यातील तलाठी दीपक मोठे याची नाशिक जिल्हा संघाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रचार व प्रसार प्रसिद्धी प्रमुख म्हणून आवाजी एकमताने निवड करण्यात आली. तसेच नाशिक उत्कृष्ट तलाठी पुरस्कार शीतल पाटील यांना प्रदान करण्यात आला.

Officials of Nashik District Talathi Sangh while guiding the attendees at the executive meeting.
Nashik News : पोलिसांनी कारवाई करावी : आयुक्त प्रवीण गेडाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com