मेनरोडसह मुख्य बाजारपेठ ‘नो व्हेईकल झोन’

मेनरोडसह मुख्य बाजारपेठ ‘नो व्हेईकल झोन’
Published on: 
फोटो : H34311 मेन रोडसह मुख्य बाजारपेठेत ‘नो व्हेईकल झोन’ घोषित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिस शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करतानाच, आगामी ३ ते ११ नोव्हेंबरदरम्यान, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मेनरोडसह प्रमुख बाजारपेठ परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेशबंद व वाहनाविरहित (नो व्हेईकल झोन) राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी दिली. दिवाळीच्या खरेदीसाठी मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार आणि भद्रकाली परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहनांची गर्दी होते. त्यामुळे या परिसरातील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ... प्रवेश बंद मार्ग मालेगाव स्टॅन्ड ते रविवार कारंजा, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, ​बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, मेनरोड मार्गे धुमाळ पॉईंट, ​सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट, ​रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट -- पर्यायी मार्ग -​मालेगाव स्टॅण्डकडून जाणारी वाहने मखमलाबाद नाका - रामवाडी - बायजाबाई छावणी - चोपडा लॉन्स - गंगापूर नाका मार्गे जातील व येतील. ​पंचवटीकडून येणारी वाहने : संतोष टी पॉईंट, द्वारका मार्गे इतरत्र जातील. जुने नाशिक भागात येण्या-जाण्यासाठी सीबीएस - शालीमार - खडकाळी सिग्नल - सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा. -- पार्किंग व्यवस्था खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बी.डी. भालेकर मैदान, शालीमार, रविवार कारंजा परिसर, गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, स्मार्टसिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंग जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.