Nashik ZP News : ग्रामसेवकांच्या आंदोलनाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अंधारात; आज होणाऱ्या बैठकीकडे ग्रामसेवकांचे लक्ष

Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक युनियनकडून असहकार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून, हजाराहून अधिक ग्रामसेवकांनी प्रशासनाशी असहकार सुरू केला आहे.
nashik zp
nashik zpesakal

Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक युनियनकडून असहकार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून, हजाराहून अधिक ग्रामसेवकांनी प्रशासनाशी असहकार सुरू केला आहे. या आंदोलनाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अंधारात असल्याचे दिसून आले. आक्रमक झालेल्या संघटनेने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम. (Non cooperation movement by gram sevak union in district)

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली असून, यात प्रलंबित मागण्या मांडत ग्रामपंचायत विभागप्रमुखांविरोधात थेट तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक कार्यमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात येत्या ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र ३० मेस श्रीमती मित्तल यांना दिले होते.

या पत्राची दखल घेत मित्तल यांनी ६ जूनला दालनात बैठक घेतली. बैठकीस युनियनसह ग्रामेसवकांच्या इतरही संघटनांना बोलविले. इतर संघटना बैठकीस उपस्थित राहिल्या. मात्र, ग्रामसेवक युनियनने बैठकीकडे पाठ फिरवत स्वतंत्र बैठकीची मागणी केली. त्यानुसार, प्रशासनाने त्यांना पत्र देत १० जूनला बैठक घेण्याचे निश्चित केले. तत्पूर्वी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मित्तल यांची भेट घेत चर्चा केली.

बैठकीत प्रशासनाने मागण्यांबाबत चर्चा केली जाईल, असे सांगत, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले; परंतु संघटनेने ठरल्याप्रमाणे असहकार आंदोलन सुरू केले. यात ग्रामसेवकांनी नियमित कामकाज करायचे मात्र, याबाबत प्रशासनाला कोणतेही सहकार्य करणार नाहीत. त्यानुसार ग्रामसेवकांनी आंदोलन सुरू केले असून, १०० टक्के आंदोलन सुरू असल्याचा दावा संघटनेने केला आहे. (latest marathi news)

nashik zp
Nashik News : पॉवर ट्रान्सफार्मर फुटल्याने नाशिक शहरासह 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

दुसरीकडे मात्र श्रीमती मित्तल यांनी संघटना आंदोलन करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे प्रशासनातील कामकाजाबाबत त्या अनभिज्ञ असल्याचे यात दिसून आले. सोमवारी (ता. १०) होणारी बैठक निर्मलवारी बैठकीमुळे मंगळवारी (ता. ११) होणार आहे. यात नेमका काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

"मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले होते; परंतु आंदोलन पूर्वनियोजित असल्याने, ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायत विभागप्रमुखांच्या कामकाजाबाबत आमच्या काही तक्रारी आहेत. मागण्यांबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त गेडाम आणि जिल्हाधिकारी शर्मा यांची भेट घेतली आहे. यात विविध विषयांवर चर्चा झाली आहे."- संजय गिरी, सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

ग्रामसेवक युनियनतर्फे विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. ग्रामसेवकांच्या दहा ते वीस वर्षांपासून जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या सोडवाव्यात. पदोन्नतीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात अनेक फायली पडून असून, त्या मार्गी लावण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे, राज्य मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस संजय गिरी, राज्य प्रसिद्धीप्रमुख बापू अहिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत ग्रामपंचायतीच्या विभागप्रमुखांविरोधात अनेक तक्रारी मांडण्यात आल्याची चर्चा आहे. सायंकाळी उशिरा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

nashik zp
Nashik Traffic News : द्वारका ते सारडा सर्कल वाहतूक कोंडी! लांबच्या लांब वाहनांच्या रांगा; अनेकांना मनस्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com