Nashik Lok Sabha Election : पोलिस कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात वाढ; कामाचा वाढला ताण, सुट्याही रद्द

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकनिमित्ताने अर्ज भरणे, रॅली, प्रचार दौरे यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले मतदान बंदोबस्ताने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
Police
Police esakal

Nashik News : लोकसभा निवडणूकनिमित्ताने अर्ज भरणे, रॅली, प्रचार दौरे यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले मतदान बंदोबस्ताने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. वैद्यकीय सुट्या वगळता अन्य सुट्याही रद्द केल्याने मनस्तापातही वाढ झाली आहे. कामाच्या धकाधकीमुळे आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. (Lok Sabha elections work pressure on police officers and employees increased)

गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राजकीय वातावरण तापले आहे. प्रचार दौरे, चौकसभा, उमेदवारी अर्ज भरणे, त्यासाठी रॅली काढणे, संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करणे, निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अशा विविध प्रकारची कामे केली जात आहे.

ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे. केवळ वैद्यकीय सुट्या सुरू आहे. पर जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू असल्याने त्याठिकाणी शहरातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. (latest marathi news)

Police
Nashik NMC News : एकीकडे निवडणुका, दुसरीकडे खोदकाम; वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा देण्यासाठी 15 मे ‘डेडलाईन’

शहर पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या त्यामुळे आणखीनच कमी झाली आहे. अशातच येथेही विविध प्रकारचा बंदोबस्त सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. गुरुवारी (ता. २) महायुती पुरस्कृत उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास उन्हाचा तडाखा बसला.

अशा अनेक प्रकारच्या घटना विविध भागांत घडल्या. असे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस भरती होणे आवश्यक आहे, अशी मागणी यानिमित्ताने होताना दिसली.

Police
Nashik Water Shortage : टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अघोषित पाणीकपात; शहरात प्रतिनागरिक सव्वाशे लिटर पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com