फोटो- 03160
नाशिक ः कालिदास कलामंदिर येथे उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख.
सुरगाणा तालुक्यातील
अधिकाऱ्यांचा सत्कार
सुरगाणा, ता. १९ ः ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील तीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यात गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर,
गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधव गावित, राशाचे सरपंच सीताराम भोये, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे, बुबळीचे सरपंच मनोहर राऊत, ग्रामविकास अधिकारी गणेश गावित, स्वच्छता अभियानाचे तालुका समन्वयक योगेश महाले, गृहनिर्माण अभियंता पल्लवी चौधरी यांचा समावेश आहे.
गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी आदिवासी भागात मिशन नवोदय, सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून अहमदाबाद येथे विज्ञान प्रयोगशाळेस भेटी करीता विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून आणला. भाभा संशोधन केंद्रास विद्यार्थी भेट, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिष्यवृत्ती परीक्षा, इंग्रजी भाषेत स्पेलिंग बी स्पर्धा आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सुरगाणासारख्या अतिदुर्गम तालुक्यात शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असतात.
या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, इतरांनाही प्रेरणा मिळेल. पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि जनसेवेच्या भावनेचा गौरव असते, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काढले.
...............