
वणी : आद्यस्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी मातेच्या धनुर्मास उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून धनुर्मासाच्या पहिल्या रविवार सकाळी सुर्यकिरण देवीच्या मुर्तीवर पडताच 'आई अंबे की जय, सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषाने अवघा सप्तश्रृंगी गड निनादून गेला. त्रिगुणात्मक स्वरूपी आद्यस्वयंभू शक्तीपीठ अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव, कोजागीरी उत्सवा प्रमाणेच धनुर्मास उत्सवही मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.