
लासलगाव : केंद्राने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे. या मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. आशिया खंडातील कांद्याचे मोठी बाजार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी नऊला लिलाव सुरु झाले.