Nashik Onion Auction: कपातीशिवाय कांदा लिलाव सुरू! सटाणा, नामपूर, देवळा, मालेगाव, सिन्नर, पिंपळगावला बाजार समितीत विक्रमी आवक

Nashik News : लेव्हीच्या प्रश्नावरून गेले पंचवीस दिवस ठप्प झालेल्या बाजार समितीतील व्यवहार आज व्यापारी, हमाल मापारी आणि बाजार समित्यांच्या सहमतीच्या भूमिकेमुळे पूर्ववत सुरू झाले.
Record arrival of onions in market committee in Nampur on Monday
Record arrival of onions in market committee in Nampur on Mondayesakal

Nashik Onion Auction : लेव्हीच्या प्रश्नावरून गेले पंचवीस दिवस ठप्प झालेल्या बाजार समितीतील व्यवहार आज व्यापारी, हमाल मापारी आणि बाजार समित्यांच्या सहमतीच्या भूमिकेमुळे पूर्ववत सुरू झाले. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याने संघटनेनेही प्रशासनासह बाजार समित्यांना धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान बाजार समित्या सुरू होताच कांद्याची सर्वत्र विक्रमी आवक झाली आहे. कांद्याचे भाव सरासरी १२०० ते १६०० पर्यत राहिले आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतिवारी करून आणावा असे आवाहन बाजार समित्यांनी केले आहे. (Nashik Onion auction starts without cutting news)

नामपूरला २७ हजार क्विंटल आवक

नामपूर : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात १ हजार २४२ वाहनांमधून सुमारे २७ हजार ५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. उन्हाळ कांद्याला १ हजार ३०० ते १ हजार १६०५ रुपये प्रती क्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली.

सभापती मनीषा पगार यांनी पुढाकार घेऊन नामपूर शहर कांदा व्यापारी असोसिएशनसोबत बैठक घेऊन कांदा मार्केट सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केल्याने सोमवारी (ता. २२)हा तिढा सुटला. कांद्याचे दर काही प्रमाणात टिकून असल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. नामपूरला ८३४ वाहने तर करंजाडला ४०८ वाहनांचे लिलाव करण्यात आले.

देवळ्यात सरासरी १४०० भाव

देवळा : देवळा बाजार समितीत सोमवारी (ता.२२) कांदा खरेदी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ७५०० क्विंटल कांद्याची आवक येऊन सरासरी १४०० रूपये भावाने कुठलीही कपात न करता कांदा खरेदी करण्यात आला. हमाली, तोलाई, वाराई प्रश्नावर गेल्या २१ दिवसापासून बंद असलेल्या देवळा बाजार समितीचे काम शेतमालाच्या हिशोब पट्टीतुन कोणतीही कपात न करता सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

देवळा बाजार समितीत ३१२ ट्रॅक्टर, ६८ पिकअप व तीन बैलगाडी अशी वाहने कांदा लिलावासाठी आली. शेतकऱ्यांना किमान ४५० रु. कमाल १८०० रु. तर सरासरी १४०० रु.भाव मिळाला. दरम्यान गेल्या २१ दिवसात देवळा बाजार समितीची जवळपास १० कोटींची उलाढाल ठप्प राहिली.(latest marathi news)

Record arrival of onions in market committee in Nampur on Monday
Latest Marathi News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहात गोंधळ

मुंगसेत २० हजार क्विंटलची आवक

मालेगाव : येथील बाजार समितीचे मुख्य बाजार आवार तसेच मुंगसे, सौंदाणे, झोडगे येथील उपबाजारातील कांदा व इतर शेतमालाचे लिलावाचे कामकाज आजपासून (ता.२२) सुरु झाले. तब्बल २५ दिवसानंतर लिलाव सुरु झाल्याने पहिल्याच दिवशी मुंगसे उपबाजारात २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावाचे कामकाज सुरु झाल्याने परिसरातील हॉटेल, उपहारगृह चालकांना व इतर व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

मुंगसे उपबाजारात सकाळपासूनच ट्रॅक्टर व पिकअपमधून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. सकाळच्या सत्रात ५३२ तर दुपारच्या सत्रात सहाशेपेक्षा अधिक वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. कांद्याला कमीत कमी पाचशे तर जास्तीत जास्त १ हजार ५४१ रुपये भाव होता. सरासरी बाजारभाव १ हजार ३८५ रुपये क्विंटल हाेता.

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात मक्यासह गहू, बाजारी, कडधान्य आदी भुसार मालाचे लिलाव झाले. व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व वाराईची रक्कम हिशोब पट्टीतून कपात न करता शेतकऱ्यांना माल विक्रीची रक्कम अदा केली. माथाडी कामगार बाजार आवारात उपस्थित होते. दरम्यान आजच्या पहिल्याच दिवशी मुख्य बाजार आवारात मक्याची १५० क्विंटल आवक होती. २५ क्विंटल कडधान्य तर ७५ क्विंटल गहू, बाजरी विक्रीसाठी आले होते. (latest marathi news)

Record arrival of onions in market committee in Nampur on Monday
Mahadev Jankar Interview: शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा, तरी महायुतीसोबत का गेले? जानकरांनी अगदी स्पष्ट सांगितलं

पिंपळगावी सरासरी १३५१ भाव

पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत सोमवारी (ता. २२) ५२७ वाहनांमधून कांदा आवक झाली. कमीत कमी ११०१, जास्तीत जास्त १८३१, तर सरासरी १३५१ रुपये दर मिळाला. २५ दिवसांनंतर लिलाव सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

येवल्यात १६ दिवसानंतर कांदा लिलाव, सरासरी १३०० रुपये भाव

येवला : लेव्हीच्या मुद्यावरून ४ एप्रिलपासून बंद असलेले कांदा लिलाव अखेर १६ दिवसानंतर बाजार समितीच्या आवारात अधिकृतपणे सुरू झाले आहेत. शनिवारी लिलाव पार पडले. मात्र, सोमवार(ता.२२)पासून खऱ्या अर्थाने लिलाव प्रक्रिया मार्गी लागली.

सोमवारी बाजार समितीच्या मुख्य आवारात ३५८ ट्रॅक्टर व पिकअप वाहनातून सुमारे ५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४०० रुपये, कमाल १४७० रुपये, तर सरासरी १३०० रुपये प्रति क्विंटल भाव होते. अंदरसुल उपबाजार आवारात १०० वाहनांमधून सुमारे १ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांदा लिलाव सुरळीत पार पडल्याने शेतकऱ्यांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Record arrival of onions in market committee in Nampur on Monday
Jalgaon Onion News : गव्हाना मारले, पण कांद्याने तारले; चोपडा तालुक्यातील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com