
येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात रोजच घसरण सुरूच असून शनिवारी (ता.२१) लिलाव सुरू झाल्यानंतर छावा संघटना व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत येवला - मनमाड मार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याचे दर कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने कांद्याला हमीभाव द्या, अनुदान द्या व निर्यात मूल्य हटवून शून्य करा अशी मागणी करण्यात आली.