Nashik Onion Crisis: कांद्याचे दर गडगडल्याने वणी येथे संतप्त शेतकऱ्यांचा रस्तारोको

Nashik Onion Crisis Angry farmers block road in Vani due to fall in onion prices
Nashik Onion Crisis Angry farmers block road in Vani due to fall in onion pricesesakal

वणी : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातल्याचे तीव्र पडसाद दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी येथील उपबाजार आवारात उमटले असून कांद्यास केेेंद्राच्या निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर ढासळल्याने बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकरी संतप्त होत, वणी येथील सापूतारा- कळवण त्रिफुलीवरील बिरसा मुंडा चौकात रस्ता रोको आंदोलन करीत केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. (Nashik Onion Crisis Angry farmers block road in Vani due to fall in onion prices)

esakal

केंद्र सरकारने प्रारंभी निर्यातशुल्क आणि नंतर कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यानंंतर आज ता. ८ पासून मार्च २०२४ पर्यंत निर्यातीवर पूर्णत: बंदी घातली. काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते.

नंतर ते हटवून कांद्याचे निर्यात मूल्य ८०० डॉलर करून निर्यातीवर अप्रत्यक्ष नियंत्रण राखले गेले. या परिस्थितीत निर्यातीचे प्रमाण कमी झाले असताना आता पूर्णपणे बंदी घातल्याची परिणती दर घसरण्यात झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

सकाळी वणी उपबाजार समितीत लिलावाला सुरुवात झाली. यावेळी काल पर्यंत कांदयास ४० ते ४५ रुपये प्रती किलो असलेला दर आज १० ते १५ रुपयां पर्यंत गडगडल्याने शेतकरी संतप्त होत बाजार समितीच्या आवारातील लिलाव प्रक्रिया बंद पाडली.

व सापूतारा - कळवण त्रीफुलीवरील बिरसा मुंडा चौकात जमा होवून कळवण व सापूताऱ्याकडे जाणाऱ्या रस्तावर कांद्याचे टॅक्टर आडवे लावून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या रस्ता रोको आंदोलनाने पोलिस यंत्रणेची एकच तारांंबळ उडाली.

Nashik Onion Crisis Angry farmers block road in Vani due to fall in onion prices
Nashik Traffic Police: शहर वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा! 46 किलोमीटर कार्यक्षेत्राचा भार 15 वाहतूक पोलिसांवर

सुमारे पाऊन तास सुरु असलेल्या रस्ता रोको सर्व बाजूंच्या रस्त्यांवर अर्धा ते पाऊन किलो मीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे यांनी बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांच्या मागण्या व आंदोलनास पाठींबा व्यक्त केेला.

दरम्यान व्यापारी संघटनेची बैठक दुपारी झाल्यानंतर बैठकीत होणाऱ्या निर्णयानूसार कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Nashik Onion Crisis Angry farmers block road in Vani due to fall in onion prices
Mumbai Agra Highway: मुंबई महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अपघातप्रवण क्षेत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com