Nashik: कोलंबो बंदरात ट्राफिक जाम, नाशिकचे कांद्याने भरलेले ६५ कंटेनर पाठवले माघारी; कोट्यवधी रुपयांचे नुकसान, जबाबदार कोण?

Colombo Port Congestion Hits Nashik Onion Exporters: नाशिक कांदा निर्यात, कोलंबो बंदर, कांदा कंटेनर. कोलंबो बंदरातील ट्राफिक जाममुळे ६५ कंटेनर माघारी परतले असून निर्यातदारांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
Nashik

Nashik

esakal

Updated on

लासलगाव: श्रीलंकेतील कोलंबो बंदरावर निर्माण झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा आणि शिपिंग व्यवस्थेतील अडथळ्यांचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातदारांना बसला आहे. आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी कंटेनर वाहतूक भारतातील न्हावा शेवा आणि विझिंजम बंदरांकडे वळविल्याने निर्यातीचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातून निर्यातीसाठी पाठविण्यात आलेले सुमारे ६५ कंटेनर कांदे माघारी परत आल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com