Farmers Protest
Farmers Protestesakal

Nashik Onion Export Duty Hike: वणी येथे निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्तारोको

Nashik Onion Export Duty Hike : कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे.

गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली. मात्र, आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे जाणवताच केंद्राने उफरटा निर्णय लादल्याची भावना. जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये आहे.

केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी वणी येथे सूरत - शिर्डी - नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येवून कांदा निर्यात शुल्काच्या वाढीच्या शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. (Nashik Onion Export Duty Hike Roadblock by farmers to protest in Wani)

केंद्र सरकारने देशातून होणार्‍या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील हा निर्णय 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील.

आज सोमवारपासून (21 ऑगस्ट) 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली जाईल, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. गत आठ दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता.

पण आता या निर्णयामुळे शेतकर्‍यांच्या मनात भाव पडण्याची भीती आहे. त्यामुळे या निर्णयांना शेतकर्‍यांकडून कडाडून विरोध होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी बांधवांच्यावतीने बिरसा मुंडा चौकात रस्ता रोकाे आंदाेलन केला.

सुमारे एक तास चाललेल्या या रस्ता रोकाे आंदोलनामुळे सापूतारा, नाशिक व कळवण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सकाळ सत्राचा लिलाव झाल्यानंतर बेमुदत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाजर समितीचे सभापती प्रशांत कड यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmers Protest
Agitation For Onion : ठेवल्यास सडतो, अन् विकायला नेल्यास रडवतो

रस्ता रोको आंदोलनात गणपतराव पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, विलास कड, महेंद्र बोरा, व्यापारी व संचालक मनिष बोरा, नंदु चोपडा, गंगाधर निखाडे, बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे आदीसह बाजार समितीचे संचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांच्यावतीने वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांना निवेदन दिले. तर कांदा निर्यात शुल्काच्या वाढीच्या शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली.

Farmers Protest
Onion : ओतूर येथे केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्याने वाढवल्याचा निषेध करत केली पत्रकाची होळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com