
लासलगाव : केंद्र सरकारकडून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याकरिता परवानगी दिल्याने अफगाणिस्तानपाठोपाठ आता इजिप्त व तुर्कीमधून १२० टन कांदा दाखल झाला आहे. सदरचा कांदा मुंबई, पुण्यासह मेट्रो शहरांत दाखल झाला. या आयातीने ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा, यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख टन कांदा खरेदी केला होता. ( Onion imports from Egypt Turkey to keep prices under control )