
नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे येत्या १२ जानेवारीला पहाटे साडेपाचला नववी राष्ट्रीय आणि १४ वी राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. स्पर्धेत विविध वयोगटांत एकूण आठ लाख ५८ हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत. धावपटूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘मविप्र’चे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.