
SAKAL Exclusive : अभियांत्रिकी शाखेच्या पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. तत्पूर्वी पार पडलेल्या पहिल्या फेरीत राज्यातील एक लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली होती. मात्र यापैकी अवघ्या २८ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. पसंतीची शाखा, महाविद्यालयात आपला क्रमांक लागेल या आशेने विद्यार्थ्यांकडून ‘वेट ॲन्ड वॉच’ केला जात असल्याचे यातून स्पष्ट होते. (Only 28 thousand 709 admission in first round of first year engineering)