
नाशिक : एक किंवा दोन विषय अनुत्तीर्ण झाल्याने पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधी मिळेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद बैठकीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना निर्णयामुळे फायदा होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पीआरएन क्रमांक खुला करण्यासंदर्भातील विषय यापूर्वी व्यवस्थापन परिषद बैठकांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. (Opportunity for 7 thousand more students to complete course )