
Nashik News : पावसाळ्यापूर्वी महापालिकेने ४६८ अतिधोकादायक इमारती व वाड्याचे पाडकाम करण्यासाठी नोटिसा बजावल्या. मात्र, त्यापैकी फक्त एकाच वाडाधारकाने वाडा पाडण्याचा संमती दिली, तर उर्वरित ४६७ वाडाधारकांनी महापालिकेच्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेने कठोर धोरण स्वीकारत नोटिसांना प्रतिसादा न देणाऱ्या वाडेधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका हद्दीमध्ये सद्य:स्थितीत १ हजार १८१ वाडे आहे. (Opposition to demolition of dangerous mansions to nmc )