
Nashik News : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मोठ्या प्रमाणात निवासी व व्यावसायिक संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहराच्या बाह्य भागाला स्पर्श करणारा रिंग रोड हैदराबादच्या धर्तीवर ६० ऐवजी ९० मीटर प्रस्तावित करावा, अशी मागणी क्रेडाई मेट्रोने नाशिक विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली. खत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देत क्रेडाईच्या सदस्यांनी प्रस्तावित आराखड्याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही केल्या. (Outer Ring Road Authority of Nashik on lines of Hyderabad )