esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : राजकीय क्षेत्रातून ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त

बोलून बातमी शोधा

nashik oxygen
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : राजकीय क्षेत्रातून ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.यानंतर सर्वस्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेतेमंडळींकडून ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत.

दुर्घटनेवर अमित शहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेची बातमी ऐकून मी दु: खी झाले आहे. ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले त्यांच्या नुकसानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या कुशलतेसाठी मी देवाला प्रार्थना करतो". असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. "नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो." असे ट्वीट करत राज्याचे राज्यपाल भगतसींह कोशारी यांनी दुखः आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत