esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २२ निष्पाप नाशिककरांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि तितकाच संतापजनक आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी बसवण्यात आलेली ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा खराब होतेच कशी, असा प्रश्‍न उपस्थित करताना महापालिकेचे विरोधी पक्षनेते तसेच नागरिकांकडून घटनेला जबाबदार अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक ऑक्सिजन टॅंक गळती दुर्घटना प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (अ) खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता.21) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होतं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलंय. तर नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या तपासासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण तपास व्हावा तसेच भविष्यात अशी घटना कधीही घडू नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील ही समिती देईल असे टोपे यांनी सांगितले.