नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार

nashik oxygen leak
nashik oxygen leakesakal

नाशिक : देशभर गाजलेल्या महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटना (nashik oxygen leak incident) पावसाळी अधिवेशनात (rainy session) गाजण्याची चिन्हे दिसून येत असून, राज्यातील २३ आमदारांनी दुर्घटनेवर तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. या संदर्भात राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने महापालिकेकडे दुर्घटनेसंदर्भातील माहिती मागविल्याने प्रश्‍नांच्या सरबत्तीला उत्तरे देताना महापालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. (nashik-oxygen-leak-incident-will-present-in-rainy-session-marathi-news)

महापालिका प्रशासनाची मोठी कसोटी

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला टाकीत ऑक्सिजन भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्हेंटिलेटरवरील २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्याचबरोबर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही स्थानिक पातळीवर घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली होती. विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने दुर्घटनेसंदर्भात अहवाल शासनाला सादर केला आहे. अहवालात काय नमूद केले आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी देशभर गाजलेल्या या दुर्घटनेचे राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी दखल घेतली असून, तब्बल २३ आमदारांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेकडे या संदर्भात राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने प्रश्‍न विचारले असून, विधानसभा सचिवांनी महापालिकेला पत्र लिहून माहिती मागविल्याने महापालिका प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे.

हे विचारले प्रश्‍न

-दुर्घटनेच्या चौकशीत काय निष्पन्न झाले?

-सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट केले का?

-जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांवर काय कारवाई केली?

-मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली का?

कोणत्या आमदारांनी विचारले प्रश्न

-दौलत दरोडा (शहापूर), सुमन पाटील (तासगाव- कवठेमहांकाळ), रोहित पवार (कर्जत- जामखेड), सुनील भुसारा (विक्रमगड), सुनील शेळके (मावळ), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), अनिल पाटील (अमळनेर), यशवंत माने (मोहोळ), नीलेश लंके (पारनेर), बाळासाहेब आजबे (आष्टी), शेखर निकम (चिपळूण), भरतशेठ गोगावले (महाड), रमेश कोरगावकर (भांडूप पश्चिम), अबू आझमी (मानखुर्द, मुंबई), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), राजेश पाटील (बोईसर), हितेंद्र ठाकूर (वसई), क्षितिज ठाकूर (नालासोपारा), विनोद निकोले (डहाणू), संजय पोतनीस (कलिना), दीपक चव्हाण (फलटण).

nashik oxygen leak
सुरगाण्यातून गुजरातमध्ये पोचविल्या जायच्या नकली नोटा

नाशिकच्या आमदारांची पाठ

ऑक्सिजन गळतीची दुर्घटना नाशिकमध्ये घडली असताना, शहर किंवा जिल्ह्यातील आमदारांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, २३ आमदारांमध्ये नाशिकचा एकही आमदार नसल्याने नाशिकच्या प्रश्‍नांबद्दल सोयरसुतक नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

nashik oxygen leak
भरधाव ट्रकने तब्बल १२ गाईंना उडवले; काही काळ महामार्ग ठप्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com