
ओझर : चूल आणि मूल ही संकल्पना फोल ठरवत उंबरखेड (ता. निफाड) येथील शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष (कै.) तुकाराम निरगुडे यांच्या कृषिकन्या श्रीमती वैशाली पाटील-निरगुडे यांनी वयाच्या चाळिशीच्या आत थेट जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घालून महिला आणि तरुणींपुढे आदर्श निर्माण केला आहे. बहुतेकांना एवढे मोठे पद हे निवृत्तीआधी दोन- तीन वर्षे मिळते. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण नियोजन आणि घरच्यांचे पाठबळ यामुळे हे शक्य झाल्याचे त्या नम्रपणे नमूद करतात.