
नाशिक: गेल्या सात महिन्यांपासून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याने जिल्ह्यातील विकास कामांचा खोळंबा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असूनही स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला. पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याची स्थिती बिकट झाली आहे.