नाशिक : ‘पंचवटी’ उशिरा; चाकरमान्यांना पुन्हा लेट मार्क

काही प्रवाशांनी निवडला ‘सेवाग्राम’चा मार्ग
Nashik Panchavati late passenger chose Sevagram route
Nashik Panchavati late passenger chose Sevagram routesakal

नाशिक रोड : पवन एक्स्प्रेसचा अपघात झाल्यानंतर परिस्थिती चोवीस तासात सावरल्यानंतर मुंबई- नाशिक मार्गावरील अनेक गाड्या लेट धावत आहे. पर्यायाने मनमाड नाशिकहून मुंबईला नोकरी- व्यवसायानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहे. मंगळवारी (ता.५) मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस उशिरा असल्याने चाकरमान्यांचे पुन्हा हाल झाले. रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागले. पंचवटी येण्याअगोदर सेवाग्राम, गरिबरथ, हावडा या तीन गाड्या सोडण्यात आल्या, परंतु पंचवटी तिकीट व पास इतर गाड्या चालत नसल्याने प्रवाशांना इतर गाड्यांनी जात आले नाही. अनेक प्रवाशांनी नियम मोडून सेवाग्रामने प्रवास करणे पसंत केले.

मनमाडहून नाशिकला मुंबईकडे रवाना होण्यासाठी गाडी येणार की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे चाकरमान्यांनी तीव्र निषेध करून नाराजी व्यक्त केली. सलग तिसऱ्या दिवशी पंचवटी नाशिक रोड रेल्वेस्थानकात नऊ वाजून चाळीस मिनिटांनी आली. पर्यायाने अनेक नोकरी करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. समयसूचकता ओळखून अनेक प्रवाशांनी सेवाग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणे पसंत केले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गाडी लेट झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्टेशन मास्तर व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गाडीची चौकशी केली. मनमाड येथे गाडी मेंटेनन्ससाठी थांबल्यामुळे हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आता सर्व सावरलेले असताना पंचवटी लेट व्हायला नको. यासाठी रेल्वेने काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सुदाम शिंदे यांनी केली आहे. देवळाली कॅम्प येथे ही अनेक व्यवसायिकांना ताटकळत रेल्वे स्टेशनवर उभे राहावे लागले. पंचवटी लेट झाल्याने गाडीच्या महसुलात आर्थिक नुकसान झालेच, मात्र व्यावसायिक व नोकरी करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

''गाडीच्या अडचणी आम्ही समजू शकतो, मात्र यापुढे पंचवटी लेट व्हायला नको. या गाडीवर किमान एक हजार लोक अवलंबून असतात. नोकरीवाल्यांना ही गाडी सोयीची आहे. त्यामुळे नियोजित वेळेपर्यंत नोकरीवर पोचता येते. रेल्वेने खबरदारी घेऊन पंचवटी वेळेत चालवावी.''

- सुदाम शिंदे, उपाध्यक्ष, प्रवासी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com