नाशिक रोड- नाशिकच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या लाखो प्रवासी यांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवत खासदार राजाभाऊ वाजे यांनी बुधवारी (ता. २३) लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना सातत्याने होणारा विलंब, स्वच्छतेचा अभाव, पाण्याचा तुटवडा, अनारक्षित डब्यांची कमतरता याबाबत खासदार वाजे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करताना थेट रेल्वे मंत्रालयाकडे माहिती मागवली.