विभागीय व जिल्हास्तरीय गटात चार ग्रामपंचायतींची निवड जाहीर

विभागीय व जिल्हास्तरीय गटात चार ग्रामपंचायतींची निवड जाहीर
Published on: 
समृद्ध पंचायतराज पुरस्कारांत नाशिकचा ‘चौकार’ विभागीय व जिल्हास्तरीय गटात चार ग्रामपंचायतींची निवड जाहीर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या विभागस्तरीय व जिल्हास्तरीय निकालात नाशिकने ‘चौकार’ मारला आहे. विभागस्तरावर दुगाव (ता. नाशिक) आणि जिल्हास्तरावर फुलेमाळवाडी (ता. देवळा), हनुमाननगर (ता. निफाड) व दरी (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (ता. ६) समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ या वर्षाचे राज्यातील विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय निकाल जाहीर केले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास विभागाने १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत उत्कृष्ट ग्रामपंचायतींची स्पर्धा घेतली. प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायतींची जिल्हास्तरावर आणि त्यातून दोन ग्रामपंचायती विभागस्तरावर निवडल्या गेल्या. प्रत्येक विभागातून दोन ग्रामपंचायती राज्यस्तरावर निवडल्या गेल्या. सर्वाधिक ग्रामपंचायती नाशिक जिल्ह्यातून निवडल्या गेल्याने नाशिकने राज्यात प्रथम क्रमांकाचे पाच कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले. यानंतर आता ग्रामविकास विभागाने राज्यातील महसूल विभागीय स्तरावरील निकाल जाहीर केले आहेत. यात दुगाव (ता. नाशिक) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे एक कोटीचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ रेनवाडी (ता. पारनेर, अहिल्यानगर) द्वितीय क्रमांकाचे ८० लाख रुपये व लोणी बुद्रुक (ता. राहाता, अहिल्यानगर) या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे ६० लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये फुलेमाळवाडी (ता. देवळा) या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपये, हनुमानगर (ता. निफाड) ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे ३० लाख रुपयांचे, तर दरी (ता. नाशिक) ग्रामपंचायतीने २० लाखांचे तृतीय पारितोषिक पटकावत नाशिकला बहुमान मिळवून दिला. ग्रामविकासमंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे लवकरच वितरण होणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी शासन निर्णयात म्हटले आहे. जिल्ह्यात १२ कोटींची ‘समृद्धी’ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेला तब्बल १२ कोटी रुपये बक्षीस रूपाने मिळाले आहे. जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाबद्दल पाच कोटी रुपये, नाशिक पंचायत समितीला दोन कोटी रुपये व लाडूद (ता. बागलाण) ग्रामपंचायतीला तीन कोटींचे बक्षीस (विभागून) जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ आता विभागस्तरीय पुरस्कारांच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी मिळणार असल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी तब्बल १२ कोटींचा अतिरिक्त निधी प्राप्त झाल्याने पुढील वर्षीच्या पुरस्कारासाठी त्याचा फायदा होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायती व पुरस्काराची रक्कम दुगाव (ता. नाशिक) : १ कोटी रुपये फुलेमाळवाडी (ता. देवळा) : ५० लाख रुपये हनुमाननगर (ता. निफाड) : ३० लाख रुपये दरी (ता. नाशिक) : २० लाख रुपये …

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.