पान-३ मुख्य अंक
NSK26H31975
नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषद गटातील प्रथम पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व अधिकारी वर्ग. शेजारी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ व प्रा. राम शिंदे आदी. (छायाचित्र ः केशव मते)
---------
NSK26H31973
नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रथम पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना सीईओ ओमकार पवार व पंचायत समितीचे अधिकारी. शेजारी प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नरहरी झिरवाळ आदी. (छायाचित्र ः केशव मते)
--------
पंचायतराज अभियानामध्ये नाशिकचा डंका
---------------
राज्यस्तरीय अभियान : नाशिक जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रथम, ग्रामपंचायतीत पुणे जिल्ह्यातील आड्याची वाडी प्रथम, लाडूद द्वितीय
---------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात-१.० नाशिक जिल्ह्याचा डंका वाजला आहे. नाशिक जिल्हा परिषद व नाशिक पंचायत समिती राज्यात प्रथम आली. तर आड्याची वाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) या ग्रामपंचायतीने राज्यात अव्वल येताना पाच कोटींचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
नाशिकमध्ये रविवारी (ता. ११) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-१.० मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्यामध्ये पंचायतराज अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रथम तीन जिल्हा परिषदांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली. तसेच पुणे आणि सांगली जिल्हा परिषदेने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
पंचायत समितीच्या गटात नाशिकला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. द्वितीय खालापूर (जि. रायगड) आणि तृतीय क्रमांक राहता (जि. अहिल्यानगर) यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत विभागात लोकसहभागातून जलसमृद्ध, पाणंद रस्ते, शाळा दुरुस्तीसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आड्याची वाडी ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. याच विभागात द्वितीय क्रमांक अनुक्रमे खामशेत (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) व लाडूद (ता. बागलाण, नाशिक) यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांकही विभागून देण्यात आला असून, त्यामध्ये उटी बुद्रुक (ता. औसा, जि. लातूर) आणि कोतवालबर्डी (ता. काटोल, नागपूर) यांना सन्मानित करण्यात आले.
---
चौकट
जिल्हा परिषद गट
प्रथम : नाशिक
द्वितीय : पुणे
तृतीय : सांगली
--
पंचायत समिती
प्रथम : नाशिक
द्वितीय : खालापूर
तृतीय : राहता
---
ग्रामपंचायत
प्रथम : आड्याची वाडी (पुरंदर, पुणे)
द्वितीय : खामशेत (ता. गुहागर, जि. रत्नागिरी), लाडूद (ता. बागलाण, नाशिक)
तृतीय : उटी बुद्रुक (ता. औसा, जि. लातूर), कोतवालबर्डी (ता. काटोल, नागपूर)
--------------------