
नाशिक : इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी दिल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र काढल्यावर मंगळवारी (ता. २९) जाधव यांच्या उमेदवारी अर्जाकडेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. श्री. जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेश सचिव राहुल दिवे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे वगळता एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. (party functionaries and workers turned their backs on filing application without cooperation of Congress in Igatpuri with Jadhav)