
जुने नाशिक : शहरातील मुंबई नाका परिसरात धावत्या बसमधून अचानक धूर येत असल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. मात्र, यावेळी चालकाच्या वेळीच बस थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेने पुन्हा एकदा महामंडळाच्या बसेच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीबीएसकडून मुंबई नाक्याच्या दिशेने बस (एमएच १४ बीटी ३७४१) शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी पावणेसहाला जात असताना अचानक बसमधून दूर येऊ लागला.