Teacher Recruitment : पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला खो वर खो! जिल्ह्यातील बेरोजगार भरतीप्रकियेच्या प्रतिक्षेत

Nashik News : शिक्षक भरती प्रकियेत होत असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलमार्फत भरती सुरु केली. त्यानुसार झालेल्या शिक्षक भरतीत पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजार उमेदवारांना नोकरी लागली.
Nashik Teacher Recruitment
Nashik Teacher Recruitmentesakal

Nashik News : यापूर्वी शिक्षक भरती प्रकियेत होत असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलमार्फत सुरु केली. त्यानुसार झालेल्या शिक्षक भरतीत पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजार उमेदवारांना नोकरी लागली. मात्र त्यानंतरच्या संस्थाच्या रिक्त पदांवरील भरती प्रकियेला लोकसभा व विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. (Pavitra portal teacher recruitment stop candidate waiting recruitment)

परंतु जिल्ह्यातील आचारसंहिता संपल्यावर अजूनही भरतीला मुहूर्त मिळत नसून विविध कारणांनी खो वर खो बसत असल्याने उमेदवारांना प्रतिक्षाच करावी लागत आहे. शिक्षण विभागात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडून पहिल्या टप्प्यात ११ हजार उमेदवारांची निवड झाली.

या भरतीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या युवकांना नशीब उजळले. डी. एड, बी. एड या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यता धारक टीईटी, सीटीईटी या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत नोंद केलेल्या जिल्हा परिषद -१२ हजार ५२२, मनपा २ हजार ९५१, नगरपालिका ४७७.

खासगी शैक्षणिक संस्थ्रा ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार गुणवता व आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी शाळांवर नेमणूक केली आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २३० जागांवर उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. (latest marathi news)

Nashik Teacher Recruitment
Nashik News : ‘एमडीएस’ प्रवेशासाठी नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत; राज्‍यस्‍तरीय कोट्याची प्रक्रिया

संस्थाच्या भरतीला विलंब

यानंतर खासगी अनुदानित शाळांवर भरतीला चालना मिळणार तोच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लगोलाग विधानपरिषदेच्या निवडणुकीचाही अडसर आल्याने गेल्या तीन महिन्यांपासून भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून विविध खासगी व्यवस्थापनांच्या राज्यात १ हजार १८९ संस्थांत मुलाखतीसह पदभरतीसाठी ४ हजार ८७९ जागा उपलब्ध आहेत.

यासाठीही लाखो युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. पवित्र पोर्टलमार्फत गुणवत्तेनुसार मुलाखतीला एका जागेसाठी १० उमेदवार (१:१० या प्रमाणात) पाठविणार असल्याने अनेकांना संधी मिळणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे ३० गुणांतून उमेदवाराची निवड संस्था करणार आहे.

आता आचारसंहिता संपली मात्र गुणवत्ता व निवड यादी अद्याप जाहीर नसल्याने पात्र इच्छुकांचे लक्ष आता दुसऱ्या यादीकडे लागले आहे. जिल्ह्यात ४५० ते ५०० च्या आसपास जागांसाठी भरती होणार असल्याने बेरोजगार युवक रोजच यादीसह पुढील कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत असून अनेकांच्या सहनशिलतेचा अंत होऊ लागला आहे.

Nashik Teacher Recruitment
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

अशी होईल भरती

३४ जिल्हा परिषद – १२,५२२ जागा

१८ महानगरपालिका -२९५१ जागा

८२ नगरपालिका/नगरपरिषद – ४७७

११२३ खाजगी संस्था – ५७२८ जागा

एकूण जागा – २१६७८

जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांसाठी ११ हजार जागांची भरती प्रक्रिया पूर्ण

पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे

अनुसूचित जाती - ३१४७ पदे

अनुसूचित जमाती - ३५४२ पदे

विमुक्त जाती (अ) - ८६२ पदे

भटक्या जमाती (ब)- ४०४पदे

भटक्या जमाती (क) - ५८२ पदे

विशेष मागास प्रवर्ग - २९० पदे

इतर मागास प्रवर्ग -४०२४ पदे

आर्थिक दुर्बल घटक - २३२४ पदे

खुला - ६१७० पदे

वर्गनिहाय रिक्त पदे

इयत्ता १-५ वी - १०२४० पदे

इयत्ता ६-८ वी - ८१२७ पदे

इयत्ता ९-१० वी - २१७६ पदे

इयत्ता ११-१२ वी ११३५ पद

Nashik Teacher Recruitment
Nashik News : सिन्नरला 650 मेट्रिक टन युरिया उपलब्ध : अभिजित जमदाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com