
Namami Goda Project : निळ्या व लाल पूररेषेत पक्की बांधकामे न करण्याच्या न्यायालयाच्या सूचना असल्याने त्या अनुषंगाने नमामि गोदा प्रकल्पात प्रस्तावित करण्यात आलेली जवळपास आठशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्याची वेळ आल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. परिणामी महापालिकेला केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीवरदेखील परिणाम होणार असल्याने व प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेकडून सल्लागार संस्थेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (Penal action against consultancy firm for delay in submission of Namami Goda project report )