
नाशिक : शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडले जाणार असून, देवळाली मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जवळपास निश्चित झाला आहे. अशा परिस्थितीत अन्य पक्षांकडून इच्छुक असलेल्यांनी शुक्रवारी (ता. १८) मुंबईत शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ठाण मांडले. अजून जागावाटप निश्चित झालेले नाही त्यामुळे थोडे थांबा असा वडिलकीचा सल्ला मिळाल्याने तुतारी फुंकण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. (people from other parties rushed to Power to advise those willing to blow be little more patient )