Nashik News: स्मार्ट रस्त्यावर नाशिककरांची ‘हर्डल रेस’; दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 15. 26 मिनिटांचा वेळ!

first smart road in the city was built from Ashokastambh to Trimbak Naka, but at present it is difficult to walk on this road.
first smart road in the city was built from Ashokastambh to Trimbak Naka, but at present it is difficult to walk on this road.esakal

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून २२ कोटी रुपये खर्चून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान तयार केलेला रस्ता कागदावरच स्मार्ट राहिला आहे. प्रत्यक्षात रस्त्याचा स्मार्टनेस नाशिककरांना दिसला तर नाहीच उलट या रस्त्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक बिकट बनली आहे.

स्मार्ट रस्ता तयार करताना पादचाऱ्यांना सुटसुटीत प्रवास करता यावा हा हेतू होता. परंतु अतिक्रमणे, सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांचे पार्किंग, पादचारी मार्गावरच लावलेले बसस्थानक, खाद्यपदार्थांच्या दुकानांनी स्मार्ट रस्त्याची वाट बिकट केली आहे.

‘सकाळ’ कडून केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत १. ६ किलोमीटर रस्ता अंतर कापण्यासाठी सात मिनिटे अपेक्षित आहे. तेथे १५. २६ मिनिटे लागतात. दुप्पट वेळ नाशिककरांसाठी परवडणारा नाही. स्मार्ट रस्त्यावरील बेशिस्तीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिका, वाहतूक पोलिस या दोन शासकीय यंत्रणेवर आहे. परंतु या दोन्ही यंत्रणा कारवाई का करत नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे. (Nashik people hurdle race on smart roads due to traffic issues Nashik News)

first smart road in the city was built from Ashokastambh to Trimbak Naka, but at present it is difficult to walk on this road.
Jayant Patil: पक्षावर निष्ठा नसलेल्यांवर राष्ट्रवादीने प्रेम करणे आता थांबावा; नाशिककरांची जयंत पाटलांना साद
esakal

काय आढळले पाहणीत?

- अशोकस्तंभ ते गुप्ते हॉस्पिटल दरम्यान दोन्ही बाजूला खाद्यपदार्थ विक्रेते.

- फुटपाथवरील बस शेल्टर खाद्यपदार्थांवर ताव.

- गुप्ते हॉस्पिटल ते मेहेर सिग्नल दरम्यान सायकल ट्रॅकवर खासगी वाहनांचे पार्किंग.

- मेहेर सिग्नलपासून न्यायालयाच्या बाजूने विक्रेत्यांचे अतिक्रमण.

- मेहेर सिग्नल ते सीबीएस दोन्ही बाजूला सायकल ट्रॅकवर वाहनांचा ताबा.

- सीबीएस ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान रिक्षाचालकांची मुजोरी.

- त्र्यंबक नाका सिग्नल ते सीबीएस सायकल ट्रॅकवर वाहनांचा ताबा.

- सीबीएस ते मेहेर शाळेच्या बाजूने खाद्यपदार्थ विक्रेते, पोलिसांची वाहने, बस शेल्टर अडथळे.

- स्मार्ट रस्त्यावरचा खर्च (२२ कोटी रुपये)

- रस्त्याची रायडींग क्वॉलिटी खराब.

- आधुनिक सिग्नल यंत्रणा अद्याप सुरूच नाही.

- सीसीटीव्ही, ई- टॉयलेट सुविधा विनावापर.

- सिटीलिंक बसमुळे वाहतुकीला अडथळा.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

first smart road in the city was built from Ashokastambh to Trimbak Naka, but at present it is difficult to walk on this road.
SAKAL Exclusive : यंदाही पाऊणशे कोटींच्या प्रलंबित 43 बिलांचा प्रश्नच!
esakal

"शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने पार्किंग व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे."

- सुदेश आहेर, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

"अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान प्रवासासाठी वाहनाशिवाय पर्याय नाही. पायी चालणे शक्य नाही. वाहनांवर पाच मिनिटात पोचता येते."

- व्यंकटेश मोरे, अध्यक्ष, अशोक स्तंभ मित्र मंडळ.

"वर्दळीचा रस्ता असल्याने सायकल ट्रॅकची आवश्‍यकता नव्हती. सायकल ट्रॅकचा उपयोग होत नाही. महापालिकेने प्रथम वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी, पोलिसांनी अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी." - सत्यम खंडाळे, विभागीय अध्यक्ष, मनसे.

शहरातील इतर मार्गांची स्थिती

मार्ग अंतर अपेक्षित कालावधी लागणारा कालावधी

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका १६०० मीटर सात मिनिटे १५.२६ मिनिटे

अशोकस्तंभ ते नेहरू चौक ८५० मीटर पाच मिनिटे १२ मिनिटे

अशोकस्तंभ ते रविवार कारंजा ६५० मीटर तीन मिनिटे ०५ मिनिटे

शालीमार चौक ते रविवार कारंजा १२०० मीटर पाच मिनिटे १२ मिनिटे

शालीमार चौक ते सीबीएस ९५० मीटर चार मिनिटे आठ मिनिटे

first smart road in the city was built from Ashokastambh to Trimbak Naka, but at present it is difficult to walk on this road.
Ram Navami 2023 : सियावर रामचंद्र की जय! जयघोषाने काळाराम मंदिराचा परिसर निनादला; पहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com