esakal | विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी
sakal

बोलून बातमी शोधा

weekend destination enjoy

विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

sakal_logo
By
संदीप पवार

डीजीपी नगर (नाशिक) : गेल्या महिना भरापासून दडी मारलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून चांगली दमदार सुरुवात केली. निसर्गाने जणू हिरवा शालूच परिधान केल्याची मनमोहक अनुभूती होत आहे. (nashik-peoples-enjoy-weekend-at-trimbakeshwar-amboli-ghat-marathi-news)

पर्यटकांनी गजबजू लागले पर्यटनस्थळे

रस्त्याने ठिक-ठिकाणी पाण्याचे ओहळ आणि डोंगर माथ्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि त्या धबधब्यांच्या वाहत्या पाण्याचा नजारा मनाला आकर्षित करू लागलाय. यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला भिजण्याचा मोह निश्चितच होतो. अशा निसर्गाच्या सानिध्यात ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रविवारची सुट्टी मजेत घालवण्यासाठी विकेंड डेस्टिनेशन म्हणून सहकुटुंब सहपरिवार गर्दी झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परिसरातील रहिवाश्यांनी गरमा-गरम मका कणीस (भुटा), विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी आणल्या आहेत. कधी तरी रानभाज्या ही निश्चित पणे आहारात खाल्ल्या पाहिजेत म्हणून ह्या भाज्या खरेदी करण्याचा मोह झाल्या वाचून राहिलच कसा; अशा निसर्गाच्या सानिध्यात मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वर, अंबोली घाट परिसर पर्यटकांनी गजबजू लागला आहे.

(nashik-peoples-enjoy-weekend-at-trimbakeshwar-amboli-ghat-marathi-news)

हेही वाचा: येवल्यात दहावीचे पोरं लई हुशार! अवघ्या तालुक्यात एकच जण नापास

हेही वाचा: राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

loading image