

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ निम्मे संपत आलेले असताना, अद्याप औषधनिर्माणशास्त्र शाखेचे अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. निवडणूक काळात प्रवेश प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे आता पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, अध्ययनाला कधीपासून सुरुवात होईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.