const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Nashik News : महामार्गावर कोसळला खांब! मनमाड शहरातील घटना

Nashik : शहरातून जाणाऱ्या इंदूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील सानप कॉम्प्लेक्ससमोर आज दुभाजकावर असलेला विजेचा मोठा खांब भररस्त्यात कलंडल्यामुळे शुक्रवारी (ता.१२) दुपारी राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाली.
An electric pole fell from the divider on the highway in the Pakija corner area here.
An electric pole fell from the divider on the highway in the Pakija corner area here.esakal

Nashik News : शहरातून जाणाऱ्या इंदूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील सानप कॉम्प्लेक्ससमोर आज दुभाजकावर असलेला विजेचा मोठा खांब भररस्त्यात कलंडल्यामुळे शुक्रवारी (ता.१२) दुपारी राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाली. वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. सायंकाळी उशिरा हा वाकलेला खांब सरळ करून तो उतरवून घेण्यात आला. त्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू होऊन सुरळीत झाली.(Nashik Pillar collapsed on highway Incident in Manmad city marathi News )

याबाबतची माहिती अशी की, मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून इंदूर- पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. मालेगाव - मनमाड - शिर्डी या मार्गावर असलेल्या पाकिजा कॉर्नर अर्थात सानप कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्याच्या दुभाजकावर असलेला इलेक्ट्रिकचा मोठा खांब भररस्त्यात कलंडला.

त्यामुळे मनमाडहून येवल्याकडे जाणाऱ्या वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. त्याचा परिणाम मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांवरदेखील झाल्याने वाहतूक खोळंबली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. भरउन्हात वाहने ताटकळत उभी राहिल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सध्या विकेंडमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.(latest marathi news)

An electric pole fell from the divider on the highway in the Pakija corner area here.
Nashik News : मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरी मालामाल! शासनाला एका वर्षात तब्बल 50 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल

त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊ लागल्याने अखेर पोलिसही रस्त्यावर उतरले. रेल्वे उड्डाणपुलाच्या सुरवातीला तसेच पाकिजा कॉर्नरवर पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. भररस्त्यात वाकलेला इलेक्ट्रिकचा खांब काढून घेण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेली वाहतूक रात्री उशिरापर्यंत हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली.

An electric pole fell from the divider on the highway in the Pakija corner area here.
Nashik News : सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; आजपासून तपासणी मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com