Nashik News : पिंपरखेड - चाळीसगाव सेक्शन रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी; मध्य रेल्वेकडून घोषणा

Nashik : मध्य रेल्वेने भुसावळ- मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची २५ किलोमीटरच्या नवीन तिसऱ्या लाईनची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
Senior officials and staff while inspecting the railway line.
Senior officials and staff while inspecting the railway line.esakal

Nashik News : मध्य रेल्वेने भुसावळ- मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची २५ किलोमीटरच्या नवीन तिसऱ्या लाईनची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. मध्य रेल्वेने ३२.०७ किमी पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची नवीन तीसरी लाईन विद्युतीकरणासहअंतर यशस्वीपणे वाहतुकीसाठी सुरू केल्याची घोषणा केली. (Nashik Pimparkhed Chalisgaon section railway line test successful marathi news)

मुंबई- हावडा या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक कमी करण्यासाठी या नवीन तिसऱ्या लाइनची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. हे परिवर्तन केवळ ऑपरेशनल कार्यक्षमतेतच वाढ करणार नाही तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेगदेखील वाढवेल. ज्यामुळे प्रवासाचा अनुभव वाढेल.

यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनोज अरोरा, मुख्य अभियंता श्रीमती इती पांडे, उपमुख्य अभियंता किशोर सिंह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(latest marathi news)

नवीन लाईन ठरणार महत्वाकांक्षी टप्पा

१८३.९४ किमी भुसावळ-मनमाड तिसरी लाईन विद्युतीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाकांक्षी टप्पा आहे. हे यश आयुक्त, रेल्वे संरक्षा (CRS), सेंट्रल सर्कलच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक सुरक्षा तपासणी आणि १२० किलोमीटर प्रतीतास चाचणीनंतर मिळाले आहे.

या विभागात पिंपरखेड, न्यायडोंगरी, हिरापूर आणि चाळीसगावसह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत. ज्यापैकी प्रत्येक स्थानकाच्या यार्डमध्ये बदल करण्यात आले आहेत. मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com