Nashik Fire Accident : हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग; वाहन जळून खाक

Fire Accident : आगेची तीव्रता एवढी होती की बाजूला असलेले गार्डन मधील साहित्य जळून खाक झाले आहे
Fire
Fire esakal

पंचवटी : हिरावाडी रोडवरील शिवम नगर येथील मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना आग लागली होती.अग्नीशामक दलाने तात्काळ पोहचत आग आटोक्यात आणली. मात्र, त्यालगत असलेली उद्यानातील खेळणी, मारुती ईरटीगा कार, एक पिंपळ तर दोन गुलमोहर झाड जळून खाक झाले आहे. यावेळी आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशामक दलाचे दोन बंब लागले. (Nashik fire accident Pipes laid in open plot on Hirawadi Road)

याबाबत अधिक माहिती अशी की, हिरावाडी रोडवर शिवम नगर आहे. पंचवटीतील आशिष मशिनरी हे शेती उपयोगी अवजारे विक्रीचे दुकान आहे. सदर दुकान मालक हे या शिवम नगर येथे वास्तव्यास असून यांच्या राहत्या घर परिसरात  मोकळ्या भूखंडावर त्यांनी दुकानातील शेती उपयोगी पाईपांचे आठ ते दहा ढिगारे ठेवले होते.

शुक्रवार (ता.०३) रोजी साडेचार वाजेच्या सुमारास या पाईपांना अचानक आग लागली. या परिसरातील एका सुजाण नागरिकाने अग्निशामक दल व पोलिस यांना संपर्क साधला. त्यावेळी पंचवटी पोलीस व अग्निशामक दलाचे दोन बंब लागलीच घटनास्थळी दाखल झाले. 

तीन झाड जळून खाक

हिरावाडी रोडवर शुक्रवार (ता.०३) रोजी आग लागली. या आगीचे प्रमाण व तीव्रता अधिक होती की, आग तीस ते पंचेचाळीस फूट आगीचा डोंब उसळला होता.मोकळ्या भूखंडलगत असलेली उद्यान, एक चारचाकी वाहन जळून खाक झाले. तसेच एक पिंपळ व दोन गुलमोहर झाड जळून खाक झाली. (Latest Marathi News)

यांनी बजाविली कामगिरी

अग्नीशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी,  लींडींग फायरमन एस जे कानडे, व्हीं आर गायकवाड,डी पी पाटील, एन पी म्हस्के, एस डी जाधव, मंगेश पिंपळे, वाहन चालक ए बी सरोदे, कवर यांनी बजाविली.

युवकाची तत्परता

हिरावाडी रोडवर लागलेली आग इतकी भीषण होती की, मोकळा भूखंड लगत उद्यानात असलेली साहित्य जळून खाक झाले. या आग लागलेल्या पाईपालगत एकूण चार वाहन लावलेली होती. त्यात मारुती सुझुकी ईरटीगा एमएच १५ जे एम ८१०० एम जळून खाक झाली. मात्र , या ईरटीगा लगत एक टाटा सुमो, एक आयशर, व्हेरिटो हे वाहन होते. आगीची तीव्रता अधिक होती.  यासाठी परिसरातील युवक बंटी कापुरे यांनी उन्हामुळे तापलेल्या गाड्यांना पाणी मारले आणि त्या वाहनांना देखील आग लागू नये याची खबरदारी घेतली.

"उद्यानातील सुकलेल्या पाला पाचोळ्यामुळे आग लागली असावी. अशी शंका परिसरातील नागरिकांना असून रोज उद्यानाची साफसफाई करत असताना उद्यानातील कचरा व पालापाचोळा या भिंतीलगत जमा केला जातो. या सुकलेल्या पाला पाचोळ्याला तीव्र उन्हामुळे आग लागली व त्या शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पाईपापर्यंत ही आग पोहोचल्याने सदरची घटना घडल्याचे अंदाज आहे. त्यामुळे उद्यान विभागाने उद्यानातील सुकलेला कचरा व पाला पाचोळा तेथेचं जमा न करता तातडीने उचलून नेणे गरजेचे आहे. यामुळे अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही. " - चंद्रशेखर पंचाक्षरी, स्थानिक रहिवासी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com