Nashik Tree Plantation : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 30 हजार वृक्षांची लागवड

Nashik News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून शहरात तीस हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
Tree Plantation
Tree Plantationesakal

Nashik News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून शहरात तीस हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यातील अकरा हजार झाडे मेरीच्या प्रांगणात लावली जाणार असून, वृक्षलागवड करताना देशी वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे अध्यक्ष विवेक भदाणे यांनी दिली. (Plantation of 30 thousand trees in background of monsoon)

महापालिकेकडून दरवर्षी वृक्षलागवड केली जाते. यंदा वृक्ष लागवडीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. या वर्षी वृक्षलागवड करताना तीस हजार लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यातील अकरा हजार झाडे पंचवटीतील मेरीच्या शासकीय जागेवर लावली जाणार आहे.

इंदिरानगर ते आंबेडकरनगर यादरम्यान जॉगिंग ट्रॅकलगत दीड हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. सिरीन मिडोज भागामध्ये ३३००, तर अमृतवन उद्यान परिसरात ५०० झाडे लावली आहे. दहा हजार झाडे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लावली जाणार आहे. महापालिकेच्या नर्सरीकडून पाच हजार रुपये तयार करण्यात आली आहे. (latest marathi news)

Tree Plantation
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

तर ५० हजार झाडे खासगी नर्सरीकडून खरेदी केली जाणार आहे. वृक्षलागवड करताना देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वड, पिंपळ, उंबर, निंब, हिरडा, आवळा, शिशू, करंज, फणस, बेल या देशी व जातीची झाडे लावली जाणार आहे.

लोकसहभागातून लागवड

तीस हजार वृक्ष लागवड करताना महापालिकेबरोबरच स्वंयसेवी संस्था व संघटना, व्यापारी, उद्योजक संघटना यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. महापालिकेच्या माध्यमातूनदेखील नागरिकांना रोपे उपलब्ध करून दिली जाणार असून, महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. भदाणे यांनी केले आहे.

Tree Plantation
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com