Nashik Fire Accident : मालेगावात आगींचा सिलसिला! दरेगाव शिवारात प्लास्टिक गोदामाला सलग तिसऱ्या दिवशी आग

Fire Accident : शहरातील दरेगाव शिवारात प्लास्टिक गोदामाला सलग तिसऱ्या दिवशी भीषण आग लागली.
A massive fire broke out in a plastic factory and godown in Daregaon Shivara near the city
A massive fire broke out in a plastic factory and godown in Daregaon Shivara near the cityesakal

Nashik Fire Accident : शहरातील दरेगाव शिवारात प्लास्टिक गोदामाला सलग तिसऱ्या दिवशी भीषण आग लागली. आगीत प्लास्टिक कारखाना व कच्चा माल जळून खाक झाला. शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. महानगरपालिका अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी बारा फेऱ्या करुन तब्बल अडीच तासानंतर आग आटोक्यात आणल्याने नजीकचे यंत्रमाग कारखाने व लाकूड कारखाने असलेले फेमस मार्केटचे लाखो रुपयांचा ऐवज वाचविण्यात यश आले. ( plastic godown in Daregaon Shivar caught fire )

दोन महिन्यात आगीच्या तब्बल ४५ घटना घडल्या. शहराजवळील देवीचा मळा, दरेगाव भागात गट नंबर ३५, प्लॉट नंबर १३ मधील समीर शफिक उल्ला यांच्या भुखंडावरील भाडेकरु असलेल्या रफिक पटेल यांच्या प्लास्टिक कारखान्याला ही आग लागली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने कारखान्यात कोणीही नव्हते. नजीकच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन दलाला माहिती मिळाली.

अग्निशमन दलाच्या तीन केंद्रातील सहा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रत्येक बंबाने प्रत्येकी दोन फेऱ्या करुन बारा बंब पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीने परिसरात शिरकाव न केल्याने व चोहोबाजूने आग विझविण्यासाठी प्रयत्न झाल्याने या कारखान्याच्या नजीक असलेले यंत्रमाग कारखाने, यंत्रसामुग्री, सागवान लाकडाची वखार, लाकूड कारखाने व लाकडापासून तयार झालेली साहित्य, साधने वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

A massive fire broke out in a plastic factory and godown in Daregaon Shivara near the city
Nashik Fire Accident: उड्डाण पुलावर ट्रकभर बटाटे खाक! लेखानगर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

अग्निशमन अधीक्षक संजय पवार, कर्मचारी रफिक खान, मोहन बैरागी, शकील अहमद, परिष लोंढे, विकास बोरगे, मोहन येशोद, रमेश सकट, सुनील बागूल, किरण सूर्यवंशी, शरद चौधरी, मुकेश बिऱ्हाडे, कृष्णा कोळपे, पृथ्वीराज कल्याणकर, वाहन चालक प्रदीप शिंदे, आरिफ बेग, जयेश सोनवणे, आबीद खान, भीमा सरदार, फिरोज पठाण, चंद्रकांत अहिरराव आदींनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

अवैध गोदामांचा विषय केवळ चर्चेत

शहरातील तापमान ४२ ते ४३ अंशावर आहे. अशातच शहराच्या दोन्ही बाजूला सीमेवर जागोजागी प्लास्टिक वेस्टेज, पन्नी, प्लास्टिक गिट्टी, कारखाने व गोदामे आहेत. प्लास्टिक पन्नी साठविण्यासाठी अनेकांनी फक्त भूखंडाला जाळीचे कुंपण केलेले आहे. त्यात प्लास्टिक कचरा साठविलेला असतो.

अशा ठिकाणी सिगरेट अथवा विडीची एक ठिणगी अथवा वाढत्या तापमानामुळेही आग लागू शकते. हा प्लास्टिक कचरा अन्यत्र उडत असतो. त्यातूनही आगीचे प्रकार घडतात. दोन महिन्यात आगीच्या ४५ घटना घडल्या. यासाठी अवैध गोदामे, कारखान्यांवर कारवाई करुन विविध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

A massive fire broke out in a plastic factory and godown in Daregaon Shivara near the city
Nashik Fire Accident : वडाळा नाका येथे वाहन बाजार दुकानाला आग!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com