नाशिक : कवी गुलाम अहमद जोया यांचं निधन

समाजातील क्षुद्र, संकुचित, मागास विचारांच्या प्रवृत्ती बरोबर आयुष्यभर त्यांचा लढा सुरू होता
 Poet Ghulam Ahmed Joya
Poet Ghulam Ahmed Joyasakal

नाशिक : येथील साहित्य क्षेत्रातील एक मोठा शायर, एक नव्या विचाराचे अतिशय प्रतिभाशाली कवी गुलाम अहमद जोया (वय ९४) सोमवारी (ता.२१) निधन झाले. समाजातील क्षुद्र, संकुचित, मागास विचारांच्या प्रवृत्तीबरोबर आयुष्यभर त्यांचा लढा सुरू होता. नाशिकच्या श्रीमंत अशा कोकणी घरात जन्मलेले जोयाजींनी पुढे अतिशय साधेपणाने राहून समाज धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपली लेखणी हाती घेतली.

कवी गुलाम अहमद जोया यांना १९९८ साली सार्वजनिक वाचनालय नाशिकचा प्रभाकर वैद्य पुरस्कार, २००३ साली गंगा किसनजी भुतडा यांच्या नावे दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार, २००५ साली महानगरपालिकेचा महापौर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा १९९८ साली 'रंगये लम्हे', २००६ साली 'देर सवेर' हा काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे. आदम मुल्ला, अँड.नंदकिशोर भुतडा यांनी पुढाकार घेऊन त्यांचे 'देर सवेर' हा काव्य संग्रह रसिकांसमोर आणला. तो अत्यंत वाचनीय ठरला. अतिशय प्रतिभावंत कवीला आपण पारखे झालो असल्याची भावना साहित्य क्षेत्रातून उमटत आहे.येथील साहित्य क्षेत्रातील एक मोठा शायर, एक नव्या विचाराचे अतिशय प्रतिभाशाली कवी गुलाम अहमद जोया (वय ९४) सोमवारी (ता.२१) निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com