Annual Sports Competition
sakal
नाशिक
Nashik Police : ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाचे वर्चस्व; सर्वसाधारण विजेतेपद पटकावले
Nashik Police Hosts 36th Annual Sports Competition : नाशिक येथील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोपप्रसंगी सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेल्या पोलीस मुख्यालयाच्या महिला व पुरुष संघाला सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते ढाल प्रदान करण्यात आली.
नाशिक: पोलिस कवायत मैदानावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ३६ व्या पोलिस क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद पोलिस मुख्यालयाने पटकावले. या स्पर्धेचा बुधवारी (ता. १५) सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांच्या प्रमुख उपस्थित समारोप करण्यात आला.